आर्थिक गुन्हे शाखेतील १३ अधिकाऱ्यांच्या बदल्या

सचिन वाझे प्रकरणानंतर मुंबई पोलीस दलात अंतर्गत बदल्यांचं सत्र सुरू आहे. याआधी गुन्हे शाखेतील ६५ अधिकाऱ्यांच्या बदल्या पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी केल्या होत्या.

आर्थिक गुन्हे शाखेतील १३ अधिकाऱ्यांच्या बदल्या
SHARES

सचिन वाझे प्रकरणानंतर मुंबई पोलीस दलात अंतर्गत बदल्यांचं सत्र सुरू आहे. याआधी गुन्हे शाखेतील ६५ अधिकाऱ्यांच्या बदल्या पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी केल्या होत्या. त्यानंतर आता आर्थिक गुन्हे शाखेतील १३ अधिकाऱ्यांच्या  बदल्या सोमवारी करण्यात आल्या. 

बदल्या केलेले अधिकारी पाच वर्षांपेक्षा जास्त काळ आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत होते, असे सांगण्यात आले. पोलीस दलाच्या प्रशासकीय विभागाने जारी के लेल्या बदल्यांच्या आदेशात आयुक्त स्तरावरील आस्थापना मंडळाने अपवादात्मक परिस्थितीत आणि प्रशासकीय निकडीनुसार कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून या अधिकाऱ्यांची बदली केल्याचं नमूद केलं आहे. 

गुन्हे शाखेत ८ ते १० वर्षे किंवा त्याहून अधिक काळ कार्यरत पोलीस उपनिरीक्षकांसह अंमलदार तसेच ५ वर्षे कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस निरीक्षक यांच्या याद्या तयार करण्यात आल्या. त्यानुसार गेल्या महिन्यात गुन्हे शाखेतील ६५ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. सोबतच स्थानिक पोलीस ठाण्यातील २१ अधिकाऱ्यांच्याही तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या होत्या. 

आता आर्थिक गुन्हे शाखेत ५ वर्षांपेक्षा अधिक काळ कार्यरत असलेल्या १३ अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली. पोलीस निरीक्षक दिलीप देशमुख (विशेष शाखा), जितेंद्र मिसाळ (संरक्षक व सुरक्षा), विनोद भालेराव (विशेष शाखा), बळीराम धस (वाहतूक), कुंडलिक गाढवे (संरक्षण व सुरक्षा), किरण जाधव (दक्षिण प्रादेशिक विभागाचे सायबर पोलीस ठाणे), सहायक निरीक्षक चंद्रशेखर गायकवाड (वाहतूक), विक्रांत शिरसाठ (एमएचबी कॉलनी पोलीस ठाणे), संदीप बडगुजर (वडाळा टीटी), दीपक कदम (मानखुर्द), प्रवीण फणसे (भांडुप), महेश तांबे (पंतनगर), धनंजय देवडीकर (शिवाजीनगर) अशी बदली करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची नावे आहेत.



हेही वाचा - 

देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी सुशील चंद्रा

आता १० वी, १२वी च्या परीक्षांसाठीही ‘एसओपी’

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा