कोरोनाबाबत अफवा पसरवणाऱ्या 115 जणांवर गुन्हा दाखल


कोरोनाबाबत अफवा पसरवणाऱ्या 115 जणांवर गुन्हा दाखल
SHARES
कोरोना संदर्भात सोशल मीडियावर अफवा व खोटी माहिती पसरविणाऱ्या 115 जणांविरोधात सायबर  पोलिसांनी गुन्हे दाखल करून कारवाई केली असल्याची माहिती राज्याचे सायबर पोलिस उपनिरीक्षक हरीश बैजल यांनी दिली आहे. 

मुंबईत लॉकडाऊन कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कोणतीही कार्यालये, दुकाने आदी चालविण्यास मनाई होती. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा किराणा दुकान तसेच अत्यावश्यक सेवांची दुकाने उघडण्याची परवानगी दिली आहे.  यामुळे नागरिकांनी एकच गर्दी केली आहे. या लॉकडाऊनमध्ये समूहाने एकत्र येण्यासही मज्जाव आहे. नागरिकांनी एकत्रित बाहेर पडून संसर्गाची भीती वाढू नये म्हणूनच राज्य सरकारने संचारबंदी लागू केली.  तर हे नियम मोडणाऱ्यांविरोधात भारतीय दंड संहिता 188 अंतर्गत कारवाई केली जाते. त्यानुसार पोलिसांकडून शहरात चोख बंदोबस्त ठेवून कायदे मोडणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे. राज्यभरात आतापर्यंत कलम 188 अंतर्गत 10 हजार गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

राज्यात आणि मुंबईत करोना हळूहळू हातपाय पसरू लागलेला असताना करोना आणि त्या संदर्भात सरकारकडून केल्या जाणाऱया उपाययोजनांसंदर्भात मोठ्या प्रमाणावर अफवांचे पीक सध्या उठले आहे. त्यामुळे आता राज्यातील सर्व सायबर पोलिस समाजमाध्यमांवरील हालचालींवर लक्ष ठेऊन असून  राज्यातील 115  गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये हे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मुंबईतही अफवा पसरवल्याप्रकरणी 9 गुन्हे दाखल करण्यात आला आहे.
...
मुंबईत 3170 जणांवर गुन्हे
लॉक डाऊनच्या काळात नियम तोडल्याप्रकरणी मुंबई पोलिसंनी 3170 व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल केला आहेत. तर  2475 जणांना अटक केली आहे.506 जणांना नोटीस देऊन सोडण्यात आले आहे. तर 189 जणांचा शोध सुरू आहे.
Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा