गिरगावातील मेहता मॅन्शन बिल्डिंगला आग

 Marine Drive
गिरगावातील मेहता मॅन्शन बिल्डिंगला आग

लॅमिग्टन रोड - रविवारी रात्री आठच्या सुमारास गिरगावमधील ड्रिमलॅंड थेएटर समोरील तीन मजली मेहता मॅन्शनला भीषण आग लागली. आगीची तीव्रता ऐवढी होती की त्यामुळे शेजारील रहिवाश्यांना देखील बिल्डिंग खाली करावी लागली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मेहता मॅन्शन इमारतीत मोठया प्रमाणात कार्यालये आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात फर्निचर जळून खाक झाले. आग लागताच तेथील रहिवाशांनी अग्निशमक दलाला याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीच्या प्रचंड धूरामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले. रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचे काम सुरू होते. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसले, तरी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचं सांगितलं जातंय.

Loading Comments