मालवणीत विजयी मिरवणुकीदरम्यान मारहाण

 Malvani
मालवणीत विजयी मिरवणुकीदरम्यान मारहाण

मालवणी - मुंबई महापालिका निवडणुकीचा निकाल गुरुवारी लागला. त्यानंतर काँग्रेसकडून विजयी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकी दरम्यान अजीज अली (30) या व्यक्तीला घरात घुसून मारहाण आणि शिवीगाळ करण्यात आली. अजीज अली यांच्या आई आणि आत्याने मध्यस्थी केली तर त्यांनाही मारहाण करण्यात आली. त्यांच्या आई आणि आत्येवर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

काँग्रेसचे आमदार असलम शेख यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप अजीज अली यांनी केलाय. "निवडणुकीच्या काळात मी आमदार असलम शेख यांनी दिलेल्या आश्वासनांची पोलखोल केली होती. त्यामुळे माझ्यावर त्यांच्याच कार्यकर्त्यांकडून हल्ला करण्यात आल्याचे पिडित अजीज अली म्हणाले. याप्रकरणी तीन जणांविरोधात विनयभंग, मारहाण, शिवीगाळ तसेच सार्वजनिक शांतता भंग केल्याप्रकरणी शुक्रवारी उशिरा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Loading Comments