मालवणीतील तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

 MHADA Ground
मालवणीतील तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

मालवणी - गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या बाबू चौधरी या तरुणाचा गुरुवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. तरुण मालाडच्या मालवणीतल्या कच्चा रोड येथील प्लॉट क्रमांक 19 मधील रहिवासी आहे. मंगळवारी त्याने राहत्या घरी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो प्रयत्न फसल्यानंतर घरच्यांनी ऑक्सर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं. तो आपल्या पत्नीसोबत तिथे राहात होता. एकवर्षापूर्वीच त्याचे लग्न झाले होते. अद्याप त्याच्या मृत्यूचं नेमके कारण समजले नसून मालवणी पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

Loading Comments