मणिपुरी विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्याला अटक


मणिपुरी विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्याला अटक
SHARES

मुंबईत आपल्या युरोपीयन मित्रासोबत लोकल ट्रेनचा प्रवास करणाऱ्या २२ वर्षीय मणिपुरी विद्यार्थिनीची छेड काढल्याची घटना उघडकीस अाली अाहे. पोलिसांनी या प्रकरणी २६ वर्षीय व्यक्तीला अटक केली. अयाज सत्तार कुरेशी असं या व्यक्तीचं नाव असून तो मानखुर्द येथे राहणारा आहे.


गर्दीमध्ये  छेडछाड 

११ सप्टेंबर रोजी हार्बर मार्गावरील वाशी ते गोवंडी स्थानकादरम्यान ही घटना घडली होती.  कुर्ला रेल्वे पोलिसांनी बुधवारी त्याला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनी मुंबईत शिकत अाहे. रेल्वे डब्यात गर्दीचा फायदा घेऊन अारोपीने तरूणीशी लगट करून छेडछाड केली. 

याप्रकरणी तिने सोमवारी वाशी रेल्वे पोलिसांत तक्रार नोंदवली होती. तिच्याकडून घेतलेल्या आरोपीच्या फोटोवरून आणि इतर स्थानकातील सीसीटीव्ही फुटेजची मदत घेऊन आरोपीला अटक करण्यात आली. याप्रकरणी आरोपीविरोधात भादंवि ३५४ या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हेही वाचा - 

मालाड रेल्वे स्थानकाजवळ आढळला महिलेचा सांगाडा

विवाहितेचा विनयभंग करणारा रोडरोमियो जेरबंदRead this story in हिंदी
संबंधित विषय