अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा अटकेत

 Kurla
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा अटकेत
Kurla, Mumbai  -  

मोबाईलवरील गेम शिकवण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला शुक्रवारी नेहरूनगर पोलिसांनी बिहार येथून अटक केली. नावेर शेख (24) असे या आरोपीचे नाव असून गेले सहा महिने तो पोलिसांच्या हातावर तुरी देत होता.

मूळचा बिहार राज्यातील रहिवासी असलेला नावेर हा नोकरीच्या शोधात मुंबईत आला होता. कुर्ल्यातील नेहरूनगर परिसरात राहात असताना त्याच्याच जवळपास राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर त्याची वाईट नजर होती. त्यातूनच नावेरने ओळखीचा फायदा घेत त्या मुलीला डिसेंबर महिन्यात घरी कोणीच नसताना गेम खेळण्यासाठी घरामध्ये बोलावून नेले. तेथेच तिच्यावर बलात्कार करून पळ काढला. तेव्हापासून नेहरुनगर पोलीस त्याच्या शोधात होते. सदर आरोपी बिहारमध्ये असल्याची माहिती मिळताच नेहरुनगर पोलिसांच्या पथकाने तेथून त्याला बेड्या ठोकल्या.

Loading Comments