एल्फिस्टनमध्ये बर्फ फोडायच्या टोचाने वेटरची हत्या


एल्फिस्टनमध्ये बर्फ फोडायच्या टोचाने वेटरची हत्या
SHARES

बारमध्ये पैसे देण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका २७ वर्षीय ग्राहकाने बर्फ फोडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या टोचाने वेटरची हत्या केल्याची घटना गुरूवारी रात्री ना. म. जोशी मार्ग इथं घडली. गणेश जानवेलकर असं या मृत वेटरचं नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी शैलेश गुप्ता(२४) या आरोपीला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.


कशी केली हत्या?

एल्फिस्टनच्या बाळ शेट मुडूळकर मार्गावरील रेड रोज कंट्री लिकर बारमध्ये गणेश मागील अनेक वर्षापासून काम करत होता. शैलेश गुरूवारी बारमध्ये मद्यपान करण्यासाठी आला होता. मद्यपान केल्यानंतर पैसे देण्यावरून त्याचे गणेशसोबत वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, दोघांमध्ये हाणामारी सुरू झाली. त्यावेळी बारच्या बाहेर बर्फ विकणाऱ्याकडून शैलेशने टोकधार टोचा हिसकावून घेत, गणेशवर जीवघेणा हल्ला केला.


आरोपीला अटक

त्याने गणेशच्या पोटात दोन ते तीन वेळा टोचा खुपसला. या घटनेची माहिती मिळताच ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांनी गणेशला तातडीने परळच्या के. ई. एम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान गणेशचा मृत्यू झाल्याचं डाॅक्टरांनी घोषित केलं. या प्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदवून शैलेशला अटक केली आहे.



हेही वाचा-

शास्त्रज्ञाच्या बेपत्ता मुलाचा मृतदेह सापडला; १२ दिवस बेपत्ता

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत घरांसाठी बनावट कागदपत्र



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा