शास्त्रज्ञाच्या बेपत्ता मुलाचा मृतदेह सापडला; १२ दिवस बेपत्ता

मृतदेहावर बाहेरून कसलीही जखम दिसून अाली नाही. नमनचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचं शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाल्याचं डाॅक्टरांनी सांगितलं अाहे.

शास्त्रज्ञाच्या बेपत्ता मुलाचा मृतदेह सापडला; १२ दिवस बेपत्ता
SHARES

वाशी येथे राहणाऱ्या बीअारसीमधील शास्त्रज्ञाच्या बेपत्ता मुलाचा मृतदेह पोलिसांना १२ दिवसांनंतर सापडला अाहे. वाशी पोलिस स्टेशनमध्ये मुलगा हरवल्याची तक्रार करण्यात अाली होती. त्यानंतर पोलिसांनी अायपीसीच्या कलम ३६३ अंतर्गत अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता.


समुद्र किनारी मृतदेह 

बीअारसीमधील शास्त्रज्ञाचा नमन दत्त हा मुलगा १२ दिवसांपूर्वी बेपत्ता झाला होता. त्याच्या पालकांनी तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. मात्र, त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. त्याचा मोबाइलही बंद होता. अखेरीस शुक्रवारी पोलिसांना समुद्र किनारी नमनचा मृतदेह अाढळून अाला. २३ सप्टेंबर नमन गायब झाला होता. त्यानंतर त्याचा मोबाइलही बंद करण्यात अाला होता.


बुडून मृत्यू

मृतदेहाची अवस्था अत्यंत वाईट असल्याची माहिती कोस्टल पोलिसांनी दिली अाहे. मृतदेहाचं तात्काळ शवविच्छेदन करण्यात अालं. मृतदेहावर बाहेरून कसलीही जखम दिसून अाली नाही. नमनचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचं शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाल्याचं डाॅक्टरांनी सांगितलं अाहे. 



हेही वाचा - 

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत घरांसाठी बनावट कागदपत्र

बुटात लपवून सोने तस्करी, आरोपीला विमानतळावरून अटक





Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा