बुटात लपवून सोने तस्करी, आरोपीला विमानतळावरून अटक

सोने बुटात लपवून मुंबईला त्याची तस्करी करण्यासाठी आलेल्या आरोपीला कस्टमच्या अधिकाऱ्यांनी विमानतळावर अटक केली आहे. मझार मोईन खान असं या आरोपीचं नाव आहे. कस्टमच्या अधिकाऱ्यांनी त्याच्याजवळून दोन बिस्किटं हस्तगत केली आहेत.

बुटात लपवून सोने तस्करी, आरोपीला विमानतळावरून अटक
SHARES

बँकॉकहून खरेदी केलेलं सोने बुटात लपवून मुंबईला त्याची तस्करी करण्यासाठी आलेल्या आरोपीला कस्टमच्या अधिकाऱ्यांनी विमानतळावर अटक केली आहे. मझार मोईन खान असं या आरोपीचं नाव आहे. कस्टमच्या अधिकाऱ्यांनी त्याच्याजवळून दोन बिस्किटं हस्तगत केली आहेत.


बुटाच्या सोल खाली लपवलं सोनं

भारतात सोन्याची किंमत दिवसेंदिवस वाढत आहे. त्या तुलनेत बँकॉकमध्ये सोनं हे स्वस्त असल्यानं मझार यांनी बँकॉकहून मुंबईत सोने तस्करीसाठी आणल्याची कबुली दिली. 

मझारने बुटाच्या सोल खाली १ किलोच्या सोन्याच्या विटा लपवून ते विमानतळावर उतरले. मात्र त्याच्या संशयास्पद हालचाली विमानतळावरील कस्टम अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्या. त्यानुसार मझारची अंगझडती घेतली असता पोलिसांना त्याच्या बुटात सोन्याच्या विटा आढळून आल्या, या दोन्ही सोन्याच्या बिस्किटांची किंमत ५६ लाख १२ हजार १३० इतकी आहे.

याप्रकरणी विमानतळ अधिकाऱ्यांनी कस्टम विभागातील कायदा १९६२ अन्वये त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुंबई विमानतळ कस्टम विभागाचे आयुक्त व्ही. रामा मॅथिव्ह यांनी याबाबत माहिती दिली असून पुढील तपास सुरू आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा