अनैतिक संबंधातून बापाकडून ५ वर्षाच्या मुलाची हत्या

मुंबईच्या डी.एन नगर परिसरात संजीव हा भाच्याकडे आला असल्याची माहिती मिळाली होती. संजीवच्या भाचाचे शेवटे मोबाइल लोकेशन पवईतील तुंगा परिसरात येत होते. त्यानुसार मध्य प्रदेशच्या पोलिसांनी पवई पोलिसांची मदत घेतली.

अनैतिक संबंधातून बापाकडून ५ वर्षाच्या मुलाची हत्या
SHARES

अनैतिक संबंधांना अडथळा ठरत असलेल्या ५ वर्षाच्या मुलाची हत्या करून मुंबईत लपलेल्या  संजीव पांडे या आरोपीला पवई पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. पुढील तपासासाठी  संजीवचा ताबा पवई पोलिसांनी मध्यप्रदेश पोलिसांना दिला आहे. 


मध्य प्रदेशमधून पळून आला

मूळचा मध्य प्रदेशच्या रिवा जिल्ह्याचा संजीव हा रहिवाशी आहे. काही वर्षांपूर्वी त्याचे लग्न झाले होते. त्याला त्याच्या पत्नीपासून ५ वर्षाचा मुलगाही आहे. संजीवचे त्याच परिसरातील एका स्त्रीशी अनैतिक संबंध होते. मात्र या दोघांच्या संबंधात पाच वर्षाचा मुलगा अडसर ठरत असल्यामुळे मुलाची हत्या करून संजीव मुंबईला पळून आला होता. संजीववर मध्यप्रदेशच्या रिवा जिल्ह्यातील पोलिस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंदवला होता.  पोलिस त्याच्या मागावर होते. त्याचा शोध घेत ते मुंबईला पोहचले.


अंधेरीतून अटक

 मुंबईच्या डी.एन नगर परिसरात संजीव हा भाच्याकडे आला असल्याची माहिती मिळाली होती. संजीवच्या भाचाचे शेवटे मोबाइल लोकेशन पवईतील तुंगा परिसरात येत होते. त्यानुसार मध्य प्रदेशच्या पोलिसांनी पवई पोलिसांची मदत घेतली. पवई पोलिसांनी अंधेरीच्या गिलबर्ट हिल रोडवरील पंचम सोसायटीत लपून बसलेल्या संजीवला शोधून काढत, त्याचा ताबा मध्यप्रदेश पोलिसांना दिला. 



हेही वाचा -

आजारपणाला कंटाळून सायनमध्ये दाम्पत्याची आत्महत्या

मुंबईच्या सुमद्रातून ४ तेल माफियांना अटक



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा