आजारपणाला कंटाळून सायनमध्ये दाम्पत्याची आत्महत्या

सायनच्या भांडारवाडा परिसरातील बीएमसी काॅलनी परिसरात विवेक हे पत्नी सरिता आणि त्यांचा ४ वर्षाचा मुलगा आर्यनसोबत रहात होते. दोन वर्षापूर्वी विवेक यांना क्षयरोग (टिबी) झाला. त्यांच्यावर उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वी या आजाराच्या सरिताही बळी झाल्या.

SHARE

मुंबईच्या सायन परिसरात आजारपणाला कंटाळून एका दाम्पत्याने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सायंकाळी उघडकीस आली आहे. विवेक कांबळे (३२) आणि तारिका कांबळे (२६) अशी या दोघांची नावे आहेत. या प्रकरणी सायन पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


क्षयरोगाची लागण

सायनच्या भांडारवाडा परिसरातील बीएमसी काॅलनी परिसरात विवेक हे पत्नी तारिका आणि त्यांचा ४ वर्षाचा मुलगा आर्यनसोबत रहात होते. दोन वर्षापूर्वी विवेक यांना क्षयरोग (टिबी) झाला. त्यांच्यावर उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वी या आजाराच्या तारिकाही बळी झाल्या. त्या दिवसापासून दोघेही नैराश्येत होते. यातूनच बुधवारी सायंकाळी मुलगा आर्यन झोपला असताना विवेक यांंनी घराच्या पंख्याला गळफास घेेतला. तर तारिका यांनी विषारी द्रव्य पिवून आत्महत्या केली. 


दरवाजा तोडला

दोघेही सायंकाळी घराबाहेर न आल्याने शेजाऱ्यांनी बाहेरून आवाज दिला. मात्र घरातून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने पोलिसांना पाचरण केले. पोलिसांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला असता विवेक यांनी गळफास घेतला होता. तर तारिका निपचीत पडल्या होत्या. पोलिसांनी दोघांना तातडीने सायन रुग्णालयात नेले असता डाॅक्टरांनी तपासून दोघांना मृत घोषित केले. हेही वाचा -

मुंबईच्या सुमद्रातून ४ तेल माफियांना अटक

बनावट बँक स्टेटमेंटद्वारे ७ कोटीचा गंडा, अकाउंटंटला अटक
संबंधित विषय
ताज्या बातम्या