मुंबईच्या सुमद्रातून ४ तेल माफियांना अटक

वाढत्या इंधन वाढीमुळे बोट चालक चिंतेत असल्याने त्यांनी समुद्रातील तेल तस्करांकडून तेलाची खरेदी करण्यास सुरूवात केल्याची माहिती पोर्ट झोन पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी समुद्र परिसरात गस्ती वाढवली होती. नुकतेच जय हनुमान ही मच्छिमारांची बोट समुद्रात संशयास्पदरित्या फिरताना आढळली.

मुंबईच्या सुमद्रातून ४ तेल माफियांना अटक
SHARES

मुंबईत तेल माफियांच्या मुसक्या मुंबई पोर्ट ट्रस्टने आवळल्यानंतर छुप्या पद्धतीने प्रवाशी बोटीतून माफियांनी तेल तस्करी सुरू केली आहे. या प्रकरणी नुकतीच पोर्ट झोनच्या यलोगेट पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. हरेश गजानन पांचाळ (४१), नितिन यशवंत कोळी (३८),सोहेल नेरुरकर (३५), सुभाष कोळी(५३) अशी या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.


३ हजार लिटर तेल

शहरापासून काही अंतरावर असलेल्या प्राचीन एलिफंटा लेणी पाहण्यासाठी आणि त्याचबरोबर समुद्राचा फेरफटका मारण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गेट वे जवळ येतात. गेट वे वरून एलिफंटा तसंच अलिबागला बोटीने प्रवाशी जातात.  वाढत्या इंधन वाढीमुळे बोट चालक चिंतेत असल्याने त्यांनी समुद्रातील तेल तस्करांकडून तेलाची खरेदी करण्यास सुरूवात केल्याची माहिती पोर्ट झोन पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी समुद्र परिसरात गस्ती वाढवली होती. नुकतेच जय हनुमान (IND-MH-7-MM-2464) ही मच्छिमारांची बोट समुद्रात संशयास्पदरित्या फिरताना आढळली.  पोलिसांनी या बोटीची तपासणी केली असता बोटीत खालच्या डेकमध्ये ३ हजार लिटर तेल सापडले. हे तेल विक्रीसाठी नेले जात होते.


परदेशी जहाजातून तेल 

हे तेल या तेलमाफियांनी परदेशातून येणाऱ्या जहाजातून कमी किंमतीत विकत घेतले होते. परदेशातून येणाऱ्या जहाजांना चार मोठी इंजिनं असतात. त्यासाठी लागणारा तेल साठा जहाजावरील कॅप्टन जहाजात भरून घेतात. मात्र, प्रत्यक्षात दोन इंजिनवरच ते जहाज चालवत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात तेल साठा उरतो. हा तेल साठा हे कॅप्टन स्थानिकांना कमी भावात विकून मोठ्या प्रमाणात पैसा कमवतात. नुकतंच पोलिसांनी जप्त केलेले तेल  हे एका तेल कंपनीकडून विकत घेतले आहे. हे तेल चार वर्षांपासून एका जहाजात सिलबंद टाकीत होेते. मात्र तेल कंपनीतील काही इंजिनिअर यांनी पैशांच्या हव्यासापोटी या तेलाची विक्री केल्याचे तपासात पुढे आले आहे. त्यामुळे लवकरच त्या इंजिनिअरवरही पोलिस कारवाई करण्याच्या प्रयत्नात असल्याचे एका बड्या अधिकाऱ्याने सांगितले.



हेही वाचा - 

बनावट बँक स्टेटमेंटद्वारे ७ कोटीचा गंडा, अकाउंटंटला अटक

नेब्युलायझरच्या नावाखाली सोन्याची तस्करी, चौघांना अटक




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा