बनावट बँक स्टेटमेंटद्वारे ७ कोटीचा गंडा, अकाउंटंटला अटक

कुणालाही त्याच्या या चोरीवर संशय येऊ नये म्हणून त्याने बँकेच्या खात्याची बनावट स्टेटमेंटही बनवून त्या स्टेटमेंटच्या आधारे आॅडिट केले होते. तसंच खऱ्या स्टेटमेंटही त्याने नष्ठ केल्या होत्या.

बनावट बँक स्टेटमेंटद्वारे ७ कोटीचा गंडा, अकाउंटंटला अटक
SHARES

बनावट बँक स्टेटमेंटच्या मदतीने कंपनीला ७ कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या अकाउंटंटला आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांंनी बुधवारी अटक केली आहे. शैलेष होनाजी हरयान असं या आरोपीचे नाव आहे.


बनावट स्टेटमेंटने आॅडिट

मिरा रोडचा रहिवाशी असलेला हरयान हा मे. लाईफस्टाईल ट्रेटलिंक इंडिया या कंपनीत अकाउंटंट होता. त्यामुळे त्याला कंपनीच्या सर्वच खात्यांविषयी बारकाईने माहिती होती. याचाच फायदा घेऊन हरयानने  २००९ ते २०१५ या कालावधीत टप्याटप्याने कंपनीच्या खात्यावरील ७ कोटी १२ लाख रुपये स्वत:च्या मालाड येथील बँकेच्या खात्यावर वळवले होते. कुणालाही त्याच्या या चोरीवर संशय येऊ नये म्हणून त्याने बँकेच्या खात्याची बनावट स्टेटमेंटही बनवून त्या स्टेटमेंटच्या आधारे आॅडिट केले होते. तसंच खऱ्या स्टेटमेंटही त्याने नष्ठ केल्या होत्या. 


बनावट शिक्के

हा प्रकार लक्षात आल्यानंतर कंपनीचे मालक जयकिशन माकीजानी यांंनी जवळील पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. मात्र गुन्ह्यातील रक्कमेचा आकडा पाहता हा गुन्हा पुढे मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला. तपासात हरयानने बँकेचे बनावट शिक्केही बनवल्याचे निदर्शनास आले. तसंच फसवणुकीची रक्कम त्याने कशा प्रकारे उधळली याची माहिती घेण्याचे काम पोलिस करत आहेत.



हेही वाचा  -

नेब्युलायझरच्या नावाखाली सोन्याची तस्करी, चौघांना अटक

हार्बर रेल्वेमध्ये पुन्हा स्टंटबाजी, दोघांना अटक




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा