नेब्युलायझरच्या नावाखाली सोन्याची तस्करी, चौघांना अटक

नेब्युलायजरच्या मशीनमध्ये चांदीचा मुलामा लावून सोन्याची तस्करी करणाऱ्या पाच जणांना महसूल गुप्तवार्ता संचलनालयाने (डीआरआय) अटक केली.

नेब्युलायझरच्या नावाखाली सोन्याची तस्करी, चौघांना अटक
SHARES

नेब्युलायजरच्या मशीनमध्ये चांदीचा मुलामा लावून सोन्याची तस्करी करणाऱ्या पाच जणांना महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) अटक केली. अहमद मोहम्मद बेद्रा, महेंद्र काटे व रविंद्र सोनार अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत. याप्रकरणी डी आरआयचे अधिकारी अधिक तपास करत आहेत.


कर्गोतून तस्करी

सहार कार्गोमध्ये आयात करून आलेल्या १५ खोक्यांमधून सोन्याची तस्करी केली जात असल्याची माहिती डीआरआयच्या अधिकाऱ्यांना होती. यातील मुख्य संशयित आरोपी महेंद्र काटे व रविंद्र सोनार यांचा यामागे हात होता. हे दोघेही एजंट म्हणून काम करतात. बेद्रासाठी हे दोघेही तस्करी करत होते. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सर्व मशीन हस्तगत केल्या.


चांदीचा मुलामा

तपासणीत ६ खोक्यांमधील नेब्यूलायजरमध्ये मशीनच नसल्याचं दिसून आलं. त्यात चांदीचा मुलामा देऊन सोन्याची तस्करी करण्यात येत असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर या मालाचा दलाल सोनार याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं. पुढे काटेच्या चौकशीत अजय ऊर्फ अहमद बेद्रा याचा हा माल असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार तिघांनाही डीआरआयने अटक केली. चौकशीदरम्यान बेद्राला हा माल केरळातील एका व्यक्तीने त्याच्यामार्फत मागवला असल्याचं सांगितलॆ. या मालासाठी बेद्रा हा काटे व सोनार यांना २० ते २२ हजार रुपये देत होता. तर बेद्राला प्रत्येक कन्सायमेंटमागे ५० हजार रुपये मिळत होते. गेल्याकाही काळात बेद्राने १० वेळा अशापद्धतीने माल आणल्याचं चौकशीत निष्पन्न झालं आहे.



हेही वाचा -

मनोमिलनानंतरही उद्धव, फडणवीस करणार वेगवेगळा प्रचार

हार्बर रेल्वेमध्ये पुन्हा स्टंटबाजी, दोघांना अटक



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा