विमानतळावर प्रवाशाकडून 3 किलो सोने जप्त

Mumbai Airport
विमानतळावर प्रवाशाकडून 3 किलो सोने जप्त
विमानतळावर प्रवाशाकडून 3 किलो सोने जप्त
विमानतळावर प्रवाशाकडून 3 किलो सोने जप्त
See all
मुंबई  -  

हवाई गुप्तचर विभागाने मुंबई विमानतळावर एका प्रवाशाकडून 3 किलो सोने जप्त केल्याने एकच खळबळ उडाली आहे. विपुल कुमार नाथुभाई (33) असे या प्रवाशाचे नाव असून, त्याच्याकडून 3 किलो 132 ग्रॅम वजनाची 27 सोन्याची बिस्किटे हवाई गुप्तचर विभागाने जप्त केली आहेत. या बिस्किटांची किंमत सुमारे 95 लाखांच्या घरात आहे.

बुधवारी रात्री दुबईवरून मुंबईला आलेल्या विपुलला त्याच्या फेसबुक प्रोफाइलवरून हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आणि त्याच्या तपासणीत सोन्याचा हा साठा सापडला. कस्टमची नजर चुकवण्यासाठी विपुलने ही सोन्याची बिस्किटे 'जिमबीम' नावाच्या दारूच्या बाटलीच्या खोक्यात लपवली होती.विपुल हिऱ्याच्या व्यापारात असून, त्याने पैशाच्या मोबदल्यात कुरिअरची भूमिका बजावल्याचा दावा हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.


हेही वाचा - 

सोन्याच्या २१ तस्करांना मुंबई विमानतळावर अटक

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ की सोन्याची खाण?


Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.