मित्रानं केला मित्रावर हल्ला

 Mayuresh Park
मित्रानं केला मित्रावर हल्ला

टेंभीपाडा - चायनिज सेंटरवर झालेल्या क्षुल्लक वादातून मित्रानंच मित्रावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना भांडुपच्या टेंभीपाडा इथे घडली आहे. प्रशांत मिश्र असं जखमीचं नाव असून त्याच्यावर भांडुपमधील स्पंदन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ला करणारा संतोष मेघे हा देखिल भाजीविक्रेताच आहे. गुरुवारी चायनिज खाताना या दोघांमध्ये वाद झाला होता. त्या रागातून प्रशांतला मारहाण करण्यासाठी आलेल्यांना प्रशांतच्या काकांनी मध्यस्थी करून थांबवलं होतं. मात्र सूड घेण्यासाठी आरोपी संतोषने रविवारी रात्री 10.30 च्या सुमारास मिश्र याला गाठत साथीदाराच्या मदतीने स्क्रू ड्रायव्हर, चाकू आणि कोयत्याने हल्ला करून पळ काढला. या प्रकरणी आरोपी संतोष आणि त्याच्या तीन साथीदारांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आहे.

Loading Comments