मोबाईल मधील (Ludo) लुडो या खेळात वारंवार पराभव होत असल्यानं रागाच्या भरात संतप्त मित्रानं मित्राची हत्या केल्याचं समोर आलं आहे. ही बाब उघडकीस येऊ नये म्हणून या मित्रानेच १० हजार रुपये देऊन बनावट मृत्यू प्रमाणपत्र तयार केले. एवढंच नाही तर मित्राचे अंतिम संस्कारही केल्याची धक्कादायक घटना मालाडमध्ये घडली.
माालाड पोलिसांकडे (Malad Police) सदर प्रकरणीची तक्रार दाखल होताच आरोपीला अटक करण्यात आली आहे. १७ मार्च २०२१ रोजी मृतक तुकाराम नलवडे आणि त्याचा मित्र अमित राज पोपट उर्फ जिमी हे मालाड दारू वाला कंपाऊंडमध्ये मोबाइलवर लुडो गेम खेळत होते.
ज्यामध्ये मृत तुकाराम वारंवार जिंकत होता, त्याचा राग काढत त्याचा मित्र जिमीनं तुकाराम सोबत भांडण सुरू केलं. भांडण इतकं वाढलं की जिमीनं तुकारामला बेदम मारहाण केली.
मारहाणीत तुकारामचा जागीच मृत्यू झाला. तुकारामच्या निधनानंतर जवळच्या लोकांनी त्याला रुग्णालयात नेलं. जिथं त्याला मृत घोषित करण्यात आलं.
दुसरीकडे, तुकारामच्या मृत्यूनंतर आरोपी जिमीनं बोरिवलीतील खासगी रुग्णालयाच्या रुग्णवाहिका चालकाच्या मदतीनं १० हजार रुपयांचे नैसर्गिक मृत्यूचं प्रमाणपत्र आणून मृतक परिवाराला दिलं. शिवाय मालाडच्या स्मशानभूमीत अंतिम संस्कार केले.
यानंतर तुकारामला आदरांजली देण्यासाठी शोक सभा आयोजित करण्यात आली होती. त्या शोकसभेत उपस्थित असलेल्यांपैकी एकानं मृतकाच्या पत्नीला तुकारामच्या मृत्यूचं कारण सांगितलं.
तुकारामच्या पत्नीनं कुटुंबातील सदस्यांना, मृत्यू नैसर्गिक नव्हे तर प्राणघातक हल्ल्यामुळे झाला आहे अशी माहिती दिली. त्यानंतर मृताच्या पत्नीनं मालाड पोलिस स्टेशनमध्ये मित्राविरूद्ध गुन्हा दाखल केला.
हेही वाचा