कुत्रीबरोबर अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या वॉचमनला अटक

एका इमारतीच्या सुरक्षा रक्षकानं कुत्रीबरोबर अनैसर्गिक कृत्य केल्याचं समोर आलं आहे.

कुत्रीबरोबर अनैसर्गिक कृत्य करणाऱ्या वॉचमनला अटक
SHARES

पुण्यात (Pune news) एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका इमारतीच्या सुरक्षा रक्षकानं कुत्रीबरोबर अनैसर्गिक कृत्य केल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या विकृत कृत्या प्रकरणी संबंधित व्यक्तीवर गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील मध्यवर्ती भागातल्या मॉडेल कॉलनी परिसरात ही घटना घडलेली आहे. याठिकाणी बाबूराव मोरे नावाचे ६५ वर्षीय व्यक्ती हे एका सोसायटीमध्ये वॉचमन पदावर कार्यरत आहेत.

बाबूराव मोरे हे सोसायटीमध्ये रात्रपाळीला वॉचमनच्या ड्युटीवर असताना त्यांनी सोसायटीच्या गेटसमोर बसलेल्या एका भटक्या कुत्रीला पकडले. या कुत्रीबरोबर संबंधित वॉचमननं अनैसर्गिक कृत्य केलं.

मॉडेल कॉलनीमध्येच राहणाऱ्या पल्लवी गौडा नावाच्या एका महिलेनं हा संपूर्ण प्रकार पाहिला. त्यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी दखल घेत कारवाई केली आहे.

या प्रकरणी महिलेनं तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तातडीनं तक्रार दाखल करून घेतली. याप्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान ही घटना घडली त्याच्या आसपास सीसीटीव्ही नसल्याचंही तपासात समोर आलं आहे.हेही वाचा

NCBच्या ताब्यात असलेला एजाज खान कोरोना पॉझिटिव्ह

MIDC चा सर्व्हर हॅक केल्याप्रकरणी अज्ञातांवर गुन्हा दाखल

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा