अॅण्टाॅप हिल परिसरात ३ अल्पवयीन मुलांवर अत्याचार

एका गर्दुल्याने त्यांना चाकूचा धाक दाखवत जवळील पडिक घरात नेलं आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले. वेदना असह्य झालेला एक मुलगा घरी रडत आला. तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याच्याजवळ विचारपूस केल्यानंतर हा प्रकर उघडकीस आला.

अॅण्टाॅप हिल परिसरात ३ अल्पवयीन मुलांवर अत्याचार
SHARES

मुंबईच्या अॅण्टाॅप हिल परिसरात ३ अल्पवयीन मुलांवर अनोळखी व्यक्तीकडून लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वडाळा टीटी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.


नेमकं काय झालं?

वडाळ्याच्या अॅण्टाॅप हिल परिसरात ही मुले रहात असून त्याचं वय १० ते १२ च्या दरम्यान आहे. शाळेत शिक्षण घेत असलेली ही मुलं गुरूवारी घराजवळून काही अंतरावर खेळत होती. त्यावेळी एका गर्दुल्याने त्यांना चाकूचा धाक दाखवत जवळील पडिक घरात नेलं आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केले. वेदना असह्य झालेला एक मुलगा घरी रडत आला. तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याच्याजवळ विचारपूस केल्यानंतर हा प्रकर उघडकीस आला.

त्यानंतर मुलांच्या पालकांनी अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा नोंदवला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.हेही वाचा-

व्यापाऱ्याच्या हत्येप्रकरणी गृहनिर्माण मंत्र्यांच्या माजी सचिवाला अटक

अभिनेत्री झरीन खानची माजी मॅनेजरविरोधात खार पोलिसांत तक्रारसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा