घाटकोपरमध्ये तरुणावर तलवारीने प्राणघातक हल्ला

  Ghatkopar
  घाटकोपरमध्ये तरुणावर तलवारीने प्राणघातक हल्ला
  मुंबई  -  

  घाटकोपरमधील सावित्रीबाई फुले नगरात राहणाऱ्या तरुणावर घरी जात असताना 15 जणांच्या टोळीने तलावारीने वार केल्याची धक्कादायक घटना रविवारी संध्याकाळी घडली. उस्मान सागिर खान(27) असं जखमी तरुणाचे नाव असून, या प्रकरणी योगेश कांबळे (23), जयंती जैन (25), कृष्णा कांबळे (27) आणि रवीनारायण लोहारही (31) या चौघांना पोलिसांनी अटक केली तर संजय उर्फ बबलू दुबे, बाली पगारे, गणेश पाटील, आकाश शिंदे, राज सिंग आणि गणेश टाक यांच्यासह नऊ आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. 

  'तेरा भाई दोपहर को हमारा मर्डर करने आया था',असे सांगून शिविगाळ करत 15 जणांच्या टोळीने खानवर तलवार आणि चॉपरने हल्ला केला. या हल्ल्यात खान गंभीर जखमी झाला आहे. खान रस्त्यावर कोसळताच हल्लेखोरांनी तेथून पळ काढला. खानवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.