मानखुर्दमध्ये पतीला पत्नीने भोसकले

 Mankhurd
मानखुर्दमध्ये पतीला पत्नीने भोसकले
Mankhurd, Mumbai  -  

दारू पिऊन त्रास देणाऱ्या पतीला पत्नीने घरातील चाकूने भोसकल्याची घटना मंगळवारी मानखूर्द येथे घडली आहे. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या पतीवर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर पत्नीवर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करत मानखुर्द पोलिसांनी तिला अटक केली आहे

सद्दाम शेख (26) असे या पतीचे नाव असून, तो त्याची पत्नी नफिसा हिच्यासह मानखुर्दच्या सतीनगर परिसरातील करबला चाळीत राहतो. सद्दामला अनेक वर्षांपासून दारू पिण्याचे व्यसन आहे. त्यामुळे दारुच्या नशेत घरी आल्यानंतर तो रोजच पत्नीला शिवीगाळ करुन मारहाण देखील करत होता. मंगळवारी सायंकाळी देखील तो नेहमीप्रमाणे दारू पिऊन घरी आल्यानंतर त्याने पत्नीला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यामुळे संतापलेल्या पत्नीने घरातील चाकू घेऊन सद्दामच्या पोटात घुसवला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. सध्या त्याच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Loading Comments