मानखुर्दमध्ये अनधिकृत तेलसाठ्यावर पोलिसांचा छापा


मानखुर्दमध्ये अनधिकृत तेलसाठ्यावर पोलिसांचा छापा
SHARES

कुठल्याही प्रकारचा परवाना नसताना अनधिकृतरित्या कच्च्या तेलाचा साठा करणाऱ्या एका गोदामावर मानखुर्द पोलिसांनी गुरुवारी छापा टाकला. यावेळी पोलिसांनी या गोदामातून 1 लाख 30 हजार लिटर तेल जप्त केलं असून यामध्ये पोलिसांनी सहा जणांना अटक देखील केली आहे. अब्दुल खान (32), राजेंद्र साहु (35), हुसेन कुरेशी (38), फिरोज खान (21), अक्रम शेख (31) आणि सरबजीत हरीजन (35) अशी या अटक करण्यात आलेल्या सहा आरोपींची नावे असून ते मानखुर्द परिसरात राहणारे आहेत.

मानखुर्द मंडाळा परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत गोदामे आहेत. या गोदामांमध्ये विविध प्रकारचे तेल आणि इतर भंगाराचा साठा केला जातो. त्यामुळेच गेल्या काही वर्षात मानखुर्द मांडला येथे अनेकदा मोठ्या प्रमाणात आग लागण्याच्या घटना घडल्या. त्यामुळे या परिसरात तेल साठ्यावर पूर्णपणे बंदी आहे. असे असताना मानखुर्द मांडळा परिसरात काही जण मोठ्या प्रमाणात अशाच प्रकारे तेलाचा साठा करत असल्याची माहिती मानखुर्द पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी याठिकाणी छापेमारी करत ही कारवाई केली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा