पेढ्यातून गुंगीचे औषध देत तरुणीवर बलात्कार

पेढ्यातून गुंगीचे औषध देत २० वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना मरीन ड्राइव्ह परिसरात उघडकीस आली आहे. आरोपीने ऐवढ्यावरच न थांबता अत्याचार करताना मुलीचे व्हिडिओ शुटींग ही केले होते.

पेढ्यातून गुंगीचे औषध देत तरुणीवर बलात्कार
SHARES

पेढ्यातून गुंगीचे औषध देत २० वर्षीय तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना मरीन ड्राइव्ह परिसरात उघडकीस आली आहे. आरोपीने ऐवढ्यावरच न थांबता अत्याचार करताना मुलीचे व्हिडिओ शुटींग ही केले होते. तब्बल एक वर्ष आरोपी तरुणीचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो सर्वत्र पसरवण्याची आणि बदनामी करण्याची धमकी देऊन अत्याचार करत होता. पीडित तरुणी गर्भवती राहिल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मरीनड्राइव्ह पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.


आरोपी धमकवायचा

मरीन ड्राइव्ह परिसरात पीडित तरुणी उच्चभ्रू वसाहतीत तिच्या कुटुंबियांसोबत राहते. फेब्रुवारी २०१८ महिन्यात नात्यातल्याच आरोपीने तिला पेढ्यातून गुंगीचे औषध दिले. त्यावेळी घरी कोणी नसताना बेशुद्ध अवस्थेत असलेल्या तरुणीवर आरोपीने अत्याचार केले. त्यावेळी आरोपीने मोबाईलमध्ये अत्याचाराचे शुटींग ही केले होते. तरुणी शुद्धीवर आल्यानंतर वेदनांनी असह्य झालेल्या तरुणीला आपल्यावर अत्याचार करण्यात आल्याचे कळाले. मात्र त्यावेळी आरोपीने तिला त्या अत्याचाराचे शुटींग दाखवून बदनामी करण्याची धमकी दिली.

 त्यानंतर आरोपी वारंवार तरुणीला बदनामी करण्याची धमकी देऊन शारिरीक संबध ठेवण्यासाठी आग्रह करायचा. रोजच्या त्रासाला कंटाळून तरुणीने ऐके दिवशी आरोपीला नकार ही दिला. मात्र त्यावेळी आरोपीने पीडितेचे अश्लील फोटो तिच्या मित्रांनाही पाठवले.


एक वर्ष अत्याचार

बदनामीच्या भीतीने एक वर्ष पीडित तरुणी आरोपीचे अत्याचार सहन करत होती. दरम्यान काही दिवसांपूर्वी पीडित तरुणी आजारी पडली असता. उपचारासाठी तिला डाॅक्टरकडे नेले असता. तरुणी गर्भवती राहीली असल्याचे कळाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. अखेर मुलीच्या तक्रारीनंतर आरोपी तरूणाला मरीन ड्राइव्ह पोलिसांनी अटक केली आहे.
संबंधित विषय