घरात घुसून जबरी चोरी

 Chembur
घरात घुसून जबरी चोरी

चेंबूर - वादातून मामानेच एका साथिदाराच्या मदतीनं भाचाच्या घरात ८८ हजारांची जबरी चोरी केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी चेंबूरच्या सहकारनगर परिसरात घडली आहे. सेल कॉलनी परिसरात राहणारे अजितकुमार आसटा यांनी मामाकडून काही पैसे घेतले होते. मात्र ते परत न दिल्याने मामाने एका साथिदाराच्या मदतीने मंगळवारी अजितकुमार यांच्या घरात घुसून त्यांना मारहाण करत घरातील लॅपटॉप, दागिने आणि रोख रक्कम असा ऐवज लंपास केला आहे. याबाबत नेहरुनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे.

Loading Comments