मयांक टिटोरियलचे संस्थापक मयांक मांडोत यांची हत्या

टूटोरियलमध्ये गणेश पवार याला रिसेपशनीस म्हणून कामावर ठेवले होते. मात्र काही कारणास्तव मयांक यांनी त्याला कामावरून कमी करत करत वेळेत पगार दिला नाही. यावरून दोघांमध्ये वाद सुरू होते.

मयांक टिटोरियलचे संस्थापक मयांक मांडोत यांची हत्या
SHARES

मुंबईच्या गोवंडी परिसरात विद्यार्थ्याने शिक्षिकेची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच, घाटकोपर पूर्व येथील शिवशक्ती इमारतीतील मयांक टिटोरियलचे चालक मयांक मांडोत (२७)  यांची आर्थिक व्यवहारातून हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे. पगार न दिल्याच्या वादातून टिटोरियलमधील कर्मचारी गणेश पवार (२६) यानेच ही हत्या केल्याचं  चौकशीत पुढं आलं असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

घाटकोपरमध्ये मयांक टिटोरियल ही प्रसिद्ध खासगी शिकवणी वर्ग घेणारी संस्था कार्यरत आहे. या संस्थेचे मालक मयांक यांनी टिटोरियलमध्ये गणेश पवार याला रिसेप्शनीस्ट म्हणून कामावर ठेवलं होतं. मात्र काही कारणास्तव मयांक यांनी त्याला कामावरून कमी करत  पगार दिला नाही. यावरून दोघांमध्ये वाद सुरू होते. दरम्यान रविवारी मयांक हे त्यांच्या घाटकोपर येथील क्लासेसमध्ये आले असताना संधी पाहून गणेशने त्यांच्यावर चाकूने वार केले.

शिकवणीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांसमोरच हा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली.  विद्यार्थ्यांनी क्लासचं शटर बाहेरून बंद करत घटनेची माहिती पंतनगर पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमी मयांक यांना राजावाडी रुग्णालयात दाखल करत आरोपीस ताब्यात घेतलं. रुग्णालयात डॉक्टरांनी  मयांक यांना मृत घोषित केलं.  पंतनगर पोलिस अधिक तपास करत आहेत.



हेही वाचा -

हत्तीच्या दातांची तस्करी करणारे अटकेत

भूरट्या चोरांची सवय काही सुटेना...




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा