पोलिसांना महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत, रवी पुजारीची न्यायालयात माहिती

रवी पुजारीला गजाली रेस्टॉरंटमधील गोळीबार प्रकरणी अटक करण्यात आली आहे. २०१६ मध्ये विलेपार्ले येथील हॉटेल गजाली येथे खंडणीसाठी आलेल्या त्याच्या साथीदाराने एका व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या होत्या.

पोलिसांना महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत, रवी पुजारीची न्यायालयात माहिती
SHARES

कुख्यात गुंड रवी पुजारीच्या पोलीस कोठडीत मुंबईतील विशेष मोक्का न्यायालयाने १५ मार्चपर्यत वाढ केली आहे. आपल्याला काही गोष्टींची तपास अधिकाऱ्यांना माहिती द्यायची असल्याचं रवी पुजारीने यावेळी न्यायालयात सांगितलं. 

दोन वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेतून रवी पुजारीला प्रत्यार्पण करून भारतात आणण्यात आलं आहे. रवी पुजारीला गजाली रेस्टॉरंटमधील गोळीबार प्रकरणी अटक करण्यात आली आहे. २०१६ मध्ये विलेपार्ले येथील हॉटेल गजाली येथे खंडणीसाठी आलेल्या त्याच्या साथीदाराने एका व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या होत्या. याप्रकरणी खंडणीविरोधी पथकाने ८ जणांना अटक करून त्यांच्याविरोधात न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. 

यातील मुख्य फरार आरोपी असलेल्या रवी पुजारीला ताब्यात घेण्यासाठी खंडणीविरोधी पथकाने न्यायालयात प्रत्यार्पणचा अर्ज दाखल केला होता. रवी पुजारीला ताब्यात घेण्यात आल्यानंतर विशेष मोक्का न्यायालयाने १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. हा कालावधी संपत असल्यामुळे मंगळवारी विशेष मोक्का न्यायालयाचे न्या. डी. ई कोथळीकर यांच्यासमोर सुनावणी पार पडली. 

पुजारीची अद्याप चौकशी सुरू आहे. तसंच त्याचा जबाब नोंदवण्याचे काम सुरू असल्याने कोठडीचा कालावधी वाढवून देण्यात यावा, अशी मागणी पोलिसांच्या वतीने करण्यात आली. मात्र, पुजारीच्या वकिलांकडून विरोध करण्यात आला. चौकशी तसंच जबाब नोंदवण्यासाठी पोलिसांना पुरेसा वेळ मिळाला असून अधिक कोठडीची गरज नसल्याचा दावाही त्यांनी केला. मात्र पुजारीने स्वत: कोर्टाला सांगितलं की, त्याला मुंबई पोलिसांना काही महत्त्वाच्या गोष्टी सांगायच्या आहेत. त्याची दखल घेत न्यायालयाने १५ मार्चपर्यंत पुजारीच्या पोलीस कोठडीत वाढ केली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा