वडापाव खाण्याच्या नादात गमावले लाखो रुपये

वडापाव खाण्याच्या नादात त्याने आपल्या गाडीतील अडीच लाख रुपये गमावले

वडापाव खाण्याच्या नादात गमावले लाखो रुपये
SHARES

मुंबईकरांना भूक लागली की, त्यांचा सर्वात आवडता वडापाव मदतीला धावून येतो. मुंबई आणि वडापाव हे समीकरण अफलातूनच आहे. वडापाव हे फक्त मुंबईचं स्ट्रीट फूडच नाही तर दिवस रात्र घड्याळय़ाच्या काट्यावर धावणार्‍या मुंबईकरांच्या खिशाला परवडणारा आणि पोट भरणारा पदार्थ आहे. मात्र यावेळी वडापाव खाणे एका जणाला महागात पडले आहे.मुंबईतील पालघर परिसरात वडापाव खाण्याच्या नादात त्याने आपल्या गाडीतील अडीच लाख रुपये गमावले आहेत.

हेही वाचाः- मध्य रेल्वेचे सीएसएमटी पहिलं 'इट राइट स्टेशन'

पालघर शहरात भोलानाथ वडापाव सेंटरनजीक गाडी रस्त्याच्या कडेला लावून वडापाव खायला गेलेल्या सातपाटीच्या या इसमाच्या गाडीतून तब्बल अडीच लाखांची चोरी झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,पालघर मधील विविध बँकांमध्ये पैसे काढून आणल्यानंतर हे पैसे या इसमाने आपल्या गाडीतील बागेत ठेवले व गाडी रस्त्याच्या कडेला लावून वडापाव खाण्यासाठी गेला. ही संधी साधत अज्ञातांनी गाडीच्या पुढील बाजुचा दरवाजाकाच तोडून पैशाने भरलेली बॅग लांबवली. तसेच गाडीच्या चाकाची हवाही काढली. मात्र ही काही या परिसरातली पहिलीच घटना आहे असे नाही.

हेही वाचाः- आयुक्तांनी केली कुख्यात गुंड एजाज लकडावालाची कसून चौकशी

या पूर्वी शहरातील माहीम रस्ता स्थित असलेल्या कुबेर शॉपिंग सेंटरकडे एका लेबर कॉन्ट्रॅक्टरने आपली गाडी लावून तो काही कामानिमित्त बाहेर गेला. यादरम्यान काही अज्ञातांनी गाडीच्या पुढची काच तोडून गाडीत पैसे असलेली बॅग लंपास केल्याची घटना घडली. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. याप्रकरणी पालघर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करीत आहे. 

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा