SHARE

गोरेगाव - प्रेमनगरमध्ये उभारण्यात आलेल्या पालिकेच्या शौचालयाच्या टाकीत पडून एका चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू झालाय. पालिका पी दक्षिण विभागानं दुरुस्तीच्या कामासाठी टाकीचं झाकण उघडलं होतं. अदिश जितेंद्र टिवट हा चार वर्षांचा मुलगा गुरुवारी दुपारी तीन वाजता शौचालयात गेला होता. मात्र त्यावेळी मुलगा उघड्या असलेल्या टाकीत पडला. ही टाकी १० फुट खोल आणि २० फुट लांब असल्यामुळे तो खोल जाऊन पडला. परिसरातील नागरिकांनी तात्काळ अग्निशमन दलाला फोन केला. अग्निशमन जवानानं एक तासाच्या प्रयत्नानं मुलाला बाहेर काढले. मात्र अदिशचा मृत्यू झाला होता. गोरेगाव पोलिसांनी संबंधित अधिकाऱ्यावरती कारवाई केली जाईल, असं सांगितलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या