घाटकोपरमध्ये चिमुरडीवर बलात्कार, आरोपीला अटक

  Ghatkopar
  घाटकोपरमध्ये चिमुरडीवर बलात्कार, आरोपीला अटक
  मुंबई  -  

  अल्पवयीन चिमुकलींवर अत्याचार आणि बलात्कार करण्याची मानसिक विकृती आजही बदलेली नाही. देशातील कानाकोपऱ्यात रोज अत्याचाराच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाहीयेत. या धावत्या मुंबईतली ही कहाणीही तशीच आहे. मुंबईतल्या घाटकोपरमधील एका आठ वर्षाच्या मुलीसोबत अशीच एक घटना घडली आहे.

  विकृत मानसिकतेच्या एका नराधमाने मुलीला त्याच्या घरात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. ही घटना सोमवारी दुपारी घडली. 21 वर्षांच्या या नराधमाचे नाव मनोज कदम आहे. पंतनगर पोलिसांनी या नराधमाला अटक केली आहे.


  कशी झाली नराधमाला अटक?

  पीडित मुलगी घटकोपरच्या लक्ष्मीनगर परिसरात राहणारी असून आरोपी देखील याच परिसरातील राहणारा आहे. सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास आरोपीने या मुलीला त्याच्या घरी नेले. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. मुलगी घरी आल्यानंतर तिच्या पोटात दुखू लागले. त्यामुळे आईने तिला विचारले असता मुलीने सर्व हकीगत सांगितली. त्यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी याबाबत पंतनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पंतनगर पोलिसांनी आरोपी मनोजविरोधात बलात्कारासह पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.    

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.