शिवडीत 5 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार

 Mumbai
शिवडीत 5 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार

शिवडी - रामगड झोपडपट्टीत राहणाऱ्या एका 5 वर्षीय मुलीवर शेजारी राहणाऱ्या सलीम हसन शेख (31) या नराधमाने बलात्कार केल्याची घटना रविवारी दुपारी शिवडीत घडली. सदर घटनेची माहिती मिळताच या नाराधमाला घटनास्थळावरून शिवडी पोलिसांनी अटक केली.

शिवडी (पू.) येथील शिवडी बंदर रोड रामगड झोपडपट्टीत राहणारा आरोपी सलीम हसन शेख एका खाजगी कंपनीत हमाल म्हणून कार्यरत आहे. रविवार सुट्टी असल्याने तो घरीच होता. तर त्याची पत्नी कामावर गेली होती. घरात आरोपीची 6 वर्षाची मुलगी होती. या मुलीबरोबर खेळण्यासाठी तसेच टीव्ही पाहण्यासाठी पीडित मुलगी नेहमी त्याच्या घरी जात असे. याचाच फायदा घेत त्याने पीडित मुलीला टीव्ही पाहण्याच्या बहाण्याने घरात बोलावले असता पीडित मुलगी टीव्ही पाहण्यासाठी त्या नराधमाच्या घरात गेली. त्यावेळी घरात त्याची मुलगीही होती. मात्र त्याने तिला दुकानातून वस्तू आणण्यासाठी बाहेर पाठवले. त्यानंतर संधीचा फायदा घेत त्याने या 5 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार केला. मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून आईने शोधाशोध केली असता. हा प्रकार उघडकीस आला.

Loading Comments