मीरा रोड पोलीस भोंदूबाबाच्या शोधात


मीरा रोड पोलीस भोंदूबाबाच्या शोधात
SHARES

गुप्तधन मिळवून देण्याच्या नावाखाली एका भोंदूबाबाने महिलेला आठ लाखांचा गंडा घातल्याची घटना मुंबईतल्या मीरा रोडमध्ये घडली आहे. पोलीस सध्या त्या भोंदूबाबा आणि त्याच्या साथीदारांच्या शोधात आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी महिला सईदा शेख ही मीरा रोड येथील पूनम सागर कॉम्पलेक्समध्ये रहाते. दोन वर्षापूर्वी सईदाची भेट नूर अहमद आणि किसन नावाच्या व्यक्तींशी झाली. या दोन्ही भोंदूबाबांनी या महिलेला तिच्या घरासमोर असलेल्या जमिनीखाली गुप्तधन असून तंत्र-मंत्राच्या सहाय्याने ते मिळू शकेल, असे सांगितले. हे ऐकून सईदाने त्यांच्या म्हणण्याप्रमाणे घरात पूजा घालण्यास होकार दिला. ढोंगी बाबाने त्याच्या इतर 5 साथीदारांसह महिलेच्या घरात पूजा केली.

या भोंदूबाबांनी दोन वर्षापर्यंत पूजेच्या नावावर महिलेकडून आठ लाख वसूल केले. पण एके दिवशी महिलेने त्या भोंदूबाबाला संपर्क केला असता त्याने फोनच उचलला नाही. तेव्हा महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने यासंदर्भाची तक्रार नयानगर पोलीस ठाण्यात केली. पोलिसांनी या तिघांविरोधात गुन्हा दाखल करत लवकरच त्यांना अटक केले जाईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा