अँटॉप हिल परिसरात पोलीस शिपायाला धक्काबुक्की


अँटॉप हिल परिसरात पोलीस शिपायाला धक्काबुक्की
SHARES

अँटॉप हिल - धक्काबुक्की झाल्याने अँटॉप हील पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई जखमी झाले. याप्रकरणी अँटॉप हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तीन फरार आरोपींचा शोध घेत आहेत. शेख मिस्त्री दर्गा इथल्या हाजी इस्माईल हाजी अल्लाना शाळा संकुल येथे मंगळवारी दुपारी ही घटना घडली. या घटनेत जखमी झालेल्या पोलीस शिपायाचं नावं प्रदीप निवृत्ती देशमुख असं आहे. घटनेतील एका आरोपीची ओळख पटली असून त्याचं नाव मोईन असल्याचं पोलिसांनी सांगितले.

मतदानाच्या दिवशी हाजी इस्माईल हाजी अल्लाना शाळा संकुल मधील मतदान केंद्र 179 मध्ये तैनात असलेले पोलीस शिपाई देशमुख आपले कर्तव्य बजावत होते. त्यावेळी आरोपी मतदान केंद्र 179 जवळ संशयास्पदरित्या फिरत असल्याचं पाहून देशमुख यांनी त्याला हटकले आणि मतदान केंद्रापासून दूर जाण्याचा इशारा दिला. त्यामुळे संतापलेल्या तरुणाने पोलीस शिपायाशी हुज्जत घालत शिवीगाळ करू लागल्याने पोलीस शिपायाने त्याला मतदान केंद्राबाहेर काढले. तरुणाचा ओरडण्याचा आवाज ऐकून त्याचे वडील आणि अज्ञात युवक घटनास्थळी हजर झाले. इतकंच नाही तर त्यांनी पोलीस शिपायाला धक्काबुक्कीही केली. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच अँटॉप हिल पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत पोलिसांवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांनी गर्दीचा फायदा घेत घटनास्थळावरून पोबारा केला.
या घटनेत आरोपी मोइन त्याचे वडील आणि भाऊ असावेत असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. या घटनेबाबत तीन आरोपींवर भा. दं. वि. कलम 353, 332, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा