मुलुंडमधून तरुण बेपत्ता

 Dalmia Estate
मुलुंडमधून तरुण बेपत्ता

मुलुंड - भिशीचे 11 हजार रुपये घेऊन 21 डिसेंबरला घराबाहेर पडलेल्या तरुणाला शोध अजूनही लागलेला नाही. मुलुंडमध्ये राहणारा नितीन त्रिभुवन नावाचा हा तरुण 21 डिसेंबरला घराबाहेर पडला होता. बऱ्याच वेळानंही तो घरी आला नाही म्हणून पत्नीनं फोन केला असता त्याचा मोबाइल घरीच असल्याचं समजलं. त्रिभुवनच्या पत्नीनं मुलुंड पोलीस ठाण्यात लगेचच तक्रार दाखल केली. पोलिसांनी ठाणे, कल्याण, नवी मुंबई अशा अनेक ठिकाणी शोध घेतला. मात्र अद्यापही त्रिभुवनला शोधण्यात यश आलेलं नाही. त्रिभुवनला नाशिकमध्ये पाहिल्याचं नातेवाईक सांगतायत. त्यामुळे आता नाशिकमध्येही शोध सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजाराम व्हनमाने यांनी दिली.

Loading Comments