मनसे नगरसेवकाला भोवला अश्लील मेसेज

 Mumbai
मनसे नगरसेवकाला भोवला अश्लील मेसेज

दादर - मनसे नगरसेवक सुधीर जाधव यांना एका महिलेला वॉटस्अपवरून अश्लील मेसेज पाठवल्या प्रकरणी गुरुवारी अटक करण्यात आली होती. भोईवाडा कोर्टाने सात हजार रुपयाच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर केला आहे.

काही दिवसांपूर्वी दादरमध्ये पत्नीचा प्रचार करण्यासाठी सुधीर जाधव तक्रारदार महिलेच्या घरी गेले होते. त्यानंतर दारुच्या नशेत जाधव यांनी तक्रारदार महिलेला व्हॉट्सअॅपवरुन रात्रभर आक्षेपार्ह मेसेज पाठवले. तसेच व्हिडिओ कॉलही केला. आपला पूर्ण फोटो पाठवण्याचा आग्रह जाधव यांनी केल्याचा दावा तक्रारदार महिलेने केला आहे. त्यानंतर पोलीस ठाण्यात तक्रार करु नये म्हणून जाधव यांनी धमकावल्याचा आरोपही या महिलेनं केला आहे. महिलेच्या तक्रारीवरून जाधव यांच्याविरोधात दादर पोलीस स्टेशनमध्ये कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Loading Comments