कुर्ला स्टेशनवरचा मोबाईल चोर अटकेत

 Kurla
कुर्ला स्टेशनवरचा मोबाईल चोर अटकेत
Kurla, Mumbai  -  

कुर्ला - आरपीएफ पोलिसांनी एका सराईत चोराला अटक केली आहे. हा चोर ट्रेनमधून उतरणाऱ्या प्रवाशांचे मोबाईल अगदी शिताफीने चोरत होता. ही बाब तेव्हा लक्षात आली जेव्हा अशोक नारायण कांबळे या प्रवाशाने आपला मोबाईल चोरी झाल्याची तक्रार कुर्ला आरपीएफ आणि जीआरपी पोलिसांना दिली. 

19 तारखेला कुर्ल्याहून घाटकोपरला जात असताना प्लॅटफॉर्म नंबर 1 वरून कांबळे ट्रेन पकडत होते. तेव्हा त्यांचा मोबाईल चोरीला गेला. त्यांनी याची तक्रार कुर्ला आरपीएफ आणि जीआरपी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी लगेच तपास करायला सुरुवात केली. 21 तारखेला पोलिसांनी या मोबाईल चोराला पकडलं. या प्रकरणात पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

Loading Comments