अवघ्या 6 हजारांसाठी कृतिकाची हत्या

Andheri west
अवघ्या 6  हजारांसाठी कृतिकाची हत्या
अवघ्या 6  हजारांसाठी कृतिकाची हत्या
अवघ्या 6  हजारांसाठी कृतिकाची हत्या
See all
मुंबई  -  

महिन्याभराच्या अथक प्रयत्नानंतर मुंबई पोलिसांनी मॉडेल कृतिका चौधरी हिच्या हत्येचा गुंता सोडवला असून या प्रकरणी शकील नसीम खान (33) आणि बादशाह उर्फ बासुदास माकमलाल दास या दोघांना अटक केली आहे. शकील नसीम खान हा एक ड्रग्ज विक्रेता असून कृतिकाची त्याच्याकडे 6 हजार रुपयांची उधारी बाकी होती. ही उधारी न दिल्याने कृतिकाची हत्या झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.


पैसे न देणे जीवावर बेतले

कृतिकाला 'एमडी' ड्रग्जचे व्यसन होते. हे ड्रग्ज ती वेगवेगळ्या ड्रग्स पेडलर्सकडून घेत असे. सन्नी उर्फ आसिफ खान हा देखील त्यापैकीच एक ड्रग्स पेडलर होता. आसिफ आपल्या डिलिव्हरी बॉयच्या मदतीने कृतिकाला ड्रग पुरवत असे. शकील खान देखील सन्नीच्या डिलिव्हरी बॉयपैकी एक होता. त्याने 7 ते 8 वेळा कृतिकाला 'एमडी' ड्रग्ज पुरवले होते.

अंमलीपदार्थ विरोधी पथकाने फेब्रुवारी 2016 मध्ये सन्नीला दीड किलो 'एमडी'सह अटक केल्यावर शकील खान तिला ड्रग्ज पुरवू लागला. दरम्यान शकीलने कृतिकाला पुरवलेल्या ड्रग्सचे 6 हजार रुपये शिल्लक असताना ऑगस्ट 2016 मध्ये त्याला देखील अंमलीपदार्थ विरोधी पथकाच्या घाटकोपर शाखेने अटक केली. नोव्हेंबरमध्ये शकील बाहेर आला. हत्येच्या काही दिवसांपूर्वी शकिलच्या मित्राला म्हणजेच बादशाहला पैशांची गरज होती. त्यासाठी त्याने शकीलला सांगितले आणि शकीलने कृतिकाच्यामागे पैशांसाठी तगादा लावला.काय झाले त्या रात्री ?

शकीलकडे कृतिकाचा मोबाइल नंबर नव्हता. त्यामुळे तो आपले पैसे मागण्यासाठी कृतिकाच्या घरीच येत असे. हत्या करण्यापूर्वी देखील दोन वेळा तो कृतिकाच्या घरी आला होता. परंतु तेव्हा कृतिका घरी नव्हती. त्याने मालाडहून टेलर आल्याचे इमारतीच्या वॉचमनला सांगितले होते.

8 जूनला रात्री शकील आणि बादशाह दोघेही कृतिकाच्या घरी आले तेव्हा कृतिका घरीच होती. घरी येताच शकील पैसे मागू लागला. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि याच वादात शकीलने तीन वेळा कृतिकाच्या डोक्यात फायटरने वार केले. या हल्ल्यानंतर कृतिका जागेवरच कोसळली. कृतिकाचे रक्त शकीलच्या शर्टावर पडले असले, तरी शकील जीमला जात असल्याने त्याच्याजवळील बॅगेत एक टीशर्ट होता. त्याने हा टीशर्ट घालून रक्ताने माखलेला शर्ट तिथेच फेकला आणि तेथून पसार झाला.कसा लागला छडा ?

हत्येचा तपास करणाऱ्या या पथकाने दिवस-रात्र एक करून या प्रकरणाचा छडा लावला. आरोपी शकीलकडे कृतिकाचा नंबर नसल्याने त्याने तिला फोन करण्याचा प्रश्नच नव्हता. शेकडो जणांची चौकशी केल्यावर पोलिसांनी आपला मोर्चा जुन्या ड्रग पेडलरकडे वळवला.

चौकशीत सन्नीेचे नाव समोर आले. पण सन्नी फेब्रुवारी 2016 पासून तरूंगात होता. त्यामुळे पोलिसांनी त्याच्या डिलिव्हरी बॉयची चौकशी सुरू केली. तेव्हा शकील गायब असल्याचे पोलिसांना समजले. पोलिस शकीलच्या मागे लागल्यानंतर तो ठिकठिकाणी पळू लागला. पोलिसांचा संशय आणखीन बळावल्यानंतर त्याला पनवेलमधून ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने कृतिकाची हत्या केल्याचे कबूल केले.हे देखील वाचा -

दिल्लीतील एअर होस्टेसच्या मारेकऱ्यांना वांद्र्यात अटकडाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

 

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.