दिल्लीतील एअर होस्टेसच्या मारेकऱ्यांना वांद्र्यात अटक


दिल्लीतील एअर होस्टेसच्या मारेकऱ्यांना वांद्र्यात अटक
SHARES

मुंबई गुन्हे शाखेने दिल्लीत झालेल्या एअर हॉस्टेसच्या हत्येचा गुन्हा सोडवला असून या प्रकरणी वांद्र्यातील बेहरामपाडा येथून मोहम्मद आदिल बने खान (23) या मुख्य आरोपींसह दोघांना अटक केली आहे.


रियाच्या मागावर

दिल्लीच्या शहादरा परिसरात 5 जुलै रोजी 21 वर्षीय रिया गौतम नावाच्या तरुणीची हत्या करण्यात आली होती. व्यवसायाने टॅक्सी चालक असलेला मोहम्मद आदिल खान (23) बऱ्याच काळापासून रियाच्या मागे होता. तो सातत्याने तिला त्रास देत असल्याने रियाने मानसरोवर पार्क पोलिस ठाण्यात त्याच्याविरोधात तक्रार देखील केली होती. पण पोलिसांनी या तक्रारीवर कुठलीही कारवाई केली नाही.

पोलिसात तक्रार दिल्याचा बदला म्हणून घटनेच्या दिवशी मोहम्मदने रियाचा पाठलाग सुरू केला. तिला मारहाण केली. त्याच्या तावडीतून कशीबशी सुटून रियाने एका फोटो स्टुडिओचा आसरा घेतला. पण तिथे घुसून मोहम्मदने तिच्यावर चाकूने सातवेळा वार केला आणि तिथून पळ काढला. रियाला जीटीबी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे काही तासांतच तिचा मृत्यू झाला.



मामाच्या घरी आसरा

रियावर हल्ला करुन मोहम्मद आणि त्याचे साथीदार जुनेद सलीम अन्सारी (19) आणि फझिल अन्सारी (18) यांनी दिल्लीहून थेट मुंबई गाठली. मुंबईत येऊन तिघेही मोहम्मदच्या बेहरामपाडा येथील मामाच्या घरात लपून बसले होते. गुरुवारी गुन्हे शाखेला हे तिघे मुंबईत लपल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखा कक्ष 9ने या तिघांना सापळा रचून अटक केली. या तिघांनाही दिल्ली पोलिसांना सोपवण्यात आले आहे.




हे देखील वाचा -

चारकोपमध्ये चालत्या कारमध्ये बलात्कार


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा