टॅक्सी चालकांना वेग नियंत्रक यंत्राबाबत दिलासा

  Mumbai
  टॅक्सी चालकांना वेग नियंत्रक यंत्राबाबत दिलासा
  मुंबई  -  

  वेग नियंत्रक बसवण्याची 30 जूनपर्यंत सक्ती करू नये, असा आदेश परिवहन आयुक्त कार्यालयाने काढल्यामुळे अनेक टॅक्सी चालकांना दिलासा मिळाला आहे. याआधी ३० जूनपर्यंत वेग नियंत्रक बसवण्याची सक्ती टॅक्सीचालकांवर करण्यात आली होती. मात्र आता वेग नियंत्रक बसवण्यासाठी टॅक्सी चालकांना 31 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

  1 मे 2017 पासून सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनांना वेग नियंत्रक बसवणे बंधनकारक केले होते. मात्र, या प्रकारच्या वाहनांना बाजारात वेग नियंत्रक उपलब्ध नसल्याने चालकांची गैरसोय होत होती. दरम्यान, गाड्यांमध्ये वेग नियंत्रक नसल्यामुळे या टॅक्सींना योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरणाची प्रक्रिया पूर्णपणे थांबवण्यात आली होती. त्याचा फटका अनेक टॅक्सी चालकांना बसला होता. परिवहन विभागाने काढलेल्या या आदेशाचा फायदा आता तब्बल 4 हजार टॅक्सी चालकांना होणार आहे.

  एकाच वेळी सर्व टॅक्सींना वेग नियंत्रक बसवणे शक्य नाही. तसेच बाजारात मोठ्या प्रमाणात ती यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळे परिणामी वेग नियंत्रक बसवण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी टॅक्सीमेन युनियनच्या वतीने करण्यात आली होती.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.