या अभिनेत्याने काढली अल्पवयीन मुलीची छेड...

शाहबाजच्या मुलीचे धावत्या दुचाकीवर केस ओढले. त्यावेळी गाडीवरील नियंञण सुटल्याने दोघी पडल्या, या कारणांवरून वाद आणखी चिघळला.

या अभिनेत्याने काढली अल्पवयीन मुलीची छेड...
SHARES

अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याप्रकरणी (Molestation Case) अभिनेता शहबाज खान (Shahbaz Khan) विरोधात तक्रार दाखल करण्यात (FIR) आली आहे. 19 वर्षांच्या मुलीने शहबाज विरोधात ओशिवरा पोलिस स्थानकात (Oshiwara Police Station) छेडछाडीची तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी शहबाजची ओशिवरा पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर शहबाजवर कलम 354 आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शाहबाजची 17 वर्षाची मुलगी मंगळवारी राञी तिच्या मैञीणीसोबत दुचाकीहून जात असताना. तिच्याच ओळखिची तरुणी त्या ठिकाणी आली. एका क्षुल्लक कारणांवरून पूर्वीच दोघींमध्ये भांडण झाले होते. त्याचा जाब विचारण्यासाठी शाहबाजच्या मुलीला त्या तरुणीने थांबवण्याचा प्रयत्न केला. माञ उगाच रस्त्यात वाद नको म्हणून शाहबाजची मुलगी दुचाकीने तेथून काढता पाय घेतला. त्यावेळी संबधित तरुणीने शाबाजच्या मुलीचा पाठलाग करून तिला गाडी थांबवण्यास सांगितली. माञ शाहबाजची मुलगी आणि गाडी चालवत असलेल्या तिच्या मैञिणीने त्याकडे दुर्लक्ष केले.


त्यावेळी राग अनावर झाल्याने शाहबाजच्या मुलीचा पाठलाग करणाऱ्या तरुणीने शाहबाजच्या मुलीचे धावत्या दुचाकीवर केस ओढले. त्यावेळी गाडीवरील नियंञण सुटल्याने दोघी पडल्या, या कारणांवरून वाद आणखी चिघळला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शाहबाज घटनास्थळी दाखल झाला. माञ तो पर्यंत शाहबाजच्या मुलीशी वाद असलेल्या मुलीने तेथून पळ काढला होता. त्या मुलीच्या मैञिणीला जाब विचारला असता. शाहबाज आणि तिच्यात वाद झाला. राग अनावर झालेल्या शाहबाजने त्यावेळी तरुणीला शिवीगाळ करत धक्काबुकी केली. या प्रकरणी तरुणीने अंबोली पोलिसात शाहबाज विरोधात तक्रार नोंदवली आहे.


शहबाज खान हा प्रसिद्ध क्लासिकल सिंगर आमिर खान यांचा मुलगा आहे. शहबाजने आतापर्यंत अनेक मालिका तसेच चित्रपटात काम केले आहे. 'युग', 'द ग्रेट मराठा', 'बेताल पच्चीसी', 'द स्वॉर्ड ऑफ टिपू सुलतान' या चित्रपटात त्याने महत्त्वाची भूमिका साकारलेली आहे. तसेच 'राम सिया के लव कुश', 'तेनाली रामा', 'दास्ता ए महोबत्त', 'फिर लौट आई नागिन', आदी मालिकांमध्येही त्याने काम केले आहे.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा