मुंबई - ट्रेनमध्ये महिलांची छेड काढणाऱ्या त्यांना अश्लाघ्य पद्धतीनं स्पर्श करणाऱ्या नराधमाला पकडण्यात रेल्वे पोलिसांना तब्बल दोन महिन्यांनी यश आलं आहे. आरोपी निलेशने त्याच्या शेजारी बसलेल्या महिलेला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श करतानाचा व्हिडिओ एका सुजाण व्यक्तीनं जवळपास दोन महिन्यांपूर्वी काढला होता. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
अचानक गुरुवारी सीएसटीकडे जाणाऱ्या अपंगांच्या डब्यात एका प्रवाशाने या निलेशला बघितलं आणि तात्काळ रेल्वे पोलिसांना त्याची माहिती दिली. त्यानंतर आरपीएफ पोलिसांनी घाटकोपरमधून आरोपी निलेशला ट्रेनमधून खाली उतरवत त्याला बेड्या ठोकल्या.