सावकाराकडून महिलेवर अत्याचार, वडाळ्यातील धक्कादायक घटना


सावकाराकडून महिलेवर अत्याचार, वडाळ्यातील धक्कादायक घटना
SHARES21 व शतक उजाडल तरी अद्याप सावकार की काही गेली नाही, घर चालवण्यासाठी पैसे नसल्याने सावकाराच्या आमीषा बळी पडून त्याला भेटायला गेलेल्या तरुणीवर सावकाराने कारमध्येच अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी वडाळा पोलिसांनी सुनिल गंगाराम अण्णा उर्फ रेड्डी (36) याला अटक केली आहे. या प्रकरणी वडाळा पोलिस अधिक तपास करत आहे.

पिडीत तरूणी 29 वर्षाची असुन, ती कुर्ला येथे राहते. या तरूणीने नोकरीसाठी 50 हजार रुपयांचे कर्ज 5टक्के व्याजाने रेड्डीकडुन घेतले होते. त्यानुसार, तीने प्रत्येक महिन्याला व्याज देण्यास सुरुवात केली होती. अशातच या तरूणीने 2018 साली पुन्हा 1 लाखांचे कर्ज घेतले. यावेळी तीने रेशनकार्ड, आधार कार्डे रेड्डीला दिले होते. त्यानंतर तीने महिना 20 हजार रुपये व्याज देण्यास सुरुवात केली. अशा पकारे तीने जानेवारी 2020 पर्यंत 5 लाख, 70हजार रुपये या सावकराला दिले. त्यानंतर तीने कर्ज फेडल्याने, व्याज देणे बंद केले.
मात्र्ा अजुन कर्ज बाकी आहे असे सांगत रेड्डीने या तरूणीला फोन करुन धमकाविण्य्ाास सुरुवात केली. मात्र तरूणीने व्याज देण्यास नकार दिला. अशातच, रेड्डीने वडाळा येथे असलेली क्रेडीट को-ऑपरेटीव्ह सोसायटी सहाय्यानेने तीला आणखी कर्ज देण्याचे अमिष दाखविले. त्यानुसार या तरूणीला बोलावुन घेतले. ही तरूणी रेड्डीला भेटण्यास जातच, त्याने तीला गाडीत बसवुन वडाळा येथे नेले. मात्र याठिकाणी गाडीतच त्यांचे कर्जावरुन वाद सुरु झाले.

यावेळी रेड्डीने निर्जनठिकाणी गाडी थांबवुन या तरूणीवर गाडीतच अत्याचार केला. तसेच याची माहिती कोणाला दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तरूणीला सायन रेल्वे स्थानक परिसरात सोडले. मात्र या तरूणीने वडाळा पोलीस ठाणे गाठुन, यापकरणी गुन्हहा दाखल केला. तर पोलिसांनी या माथेफिरुला अटक करीत, याचा अधिक तपास करण्यास सुरुवात केली.
संबंधित विषय