इस्तंबूल हल्ला - अबिस, खुशी यांचे मृतदेह मुंबईत

मुंबई - नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी तुर्कस्थानातील इस्तंबूल शहरात गेलेल्या अबिस रिझवी आणि खुशी शाह यांचा रीना या नाइट क्लबवरील हल्ल्यात मृत्यू झाला होता. अबिस रिझवी आणि खुशी शाह या दोघांचेही मृतदेह बुधवार, 4 जानेवारी रोजी मुंबईत आणण्यात आले. बुधवारी सकाळी 6च्या सुमारास ही दोन्ही कुटुंबं मृतदेहांसह मुंबईत आले. या वेळी खासदार किरीट सोमय्याही एअरपोर्टवर उपस्थित होते. सोमय्या यांनी दिलेल्या माहितीनुसार खुशीचा मृतदेह बडोद्याला, तिच्या मूळ गावी पाठवला जाईल, तर अबिस रिझवीच्या पार्थिवावर बुधवारी संध्याकाळी अंत्यसंस्कार होतील.

Loading Comments