४ वर्षाच्या मुलाला गळफास देऊन आईचीही आत्महत्या

अनुजा वंजारी असं आत्महत्या करणाऱ्या महिलेचं नाव असून या प्रकरणी विनोबा भावे नगर पोलिस ठाण्यात पती विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

SHARE

पतीच्या जाचाला कंटाळून कुर्ल्यात एका आईनं आपल्या चार वर्षाच्या मुलाला गळफास लावत स्वतःही आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. अनुजा वंजारी असं आत्महत्या करणाऱ्या महिलेचं नाव असून या प्रकरणी विनोबा भावे नगर पोलिस ठाण्यात पती विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

विनोभा भावेनगर पोलिस ठाण्याच्या शिंगारे वाडी परिसरात अनुजा पती दिपक आणि चार वर्षाचा मुलगा श्री यांच्यासोबत रहात होती. लग्नानंतर तिचा पती दिपक हा दारूच्या व्यसनाच्या आहारी गेला होता. त्यामुळे नशेत तो अनुजा यांना वारंवार त्रास द्यायचा. अनेकांकडून त्यानं पैसेही उधारीवर घेतले होते. त्यामुळे देणेकरी वारंवार घरी येऊ लागले होते. रोजच्या या त्रासाला कंटाळून अखेर अनुजानं स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला.

मंगळवारी आत्महत्या करण्यापूर्वी अनुजानं तिच्या घरच्यांशीही बोलणं केलं. घरच्यांनीही तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र अनुजा तिच्या निर्णयावर ठाम होती. यातूनच तिनं घरी कुणी नसताना मंगळवारी आपल्या चार वर्षाच्या मुलाला गळफास दिला. त्यानंतर स्वतःही गळफास घेत आत्महत्या केली.

याबाबतची माहिती विनोबा भावे पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. तसंच अनुजा यांच्या पती दिपकला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहेहेही वाचा

डॉली बिंद्रा विरोधात आणखी एक गुन्हा दाखल

राज्याच्या माजी महसूलमंत्र्यांच्या नावानं जमिन घोटाळासंबंधित विषय
ताज्या बातम्या