'आम्हाला किमान स्वेच्छा मरणाची परवानगी द्या'; एसटी कर्मचाऱ्यांचा थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

विलीनीकरण या प्रमुख मागणीसाठी संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला ५७ दिवस पूर्ण झाले आहेत.

'आम्हाला किमान स्वेच्छा मरणाची परवानगी द्या'; एसटी कर्मचाऱ्यांचा थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
SHARES

विलीनीकरण या प्रमुख मागणीसाठी संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला ५७ दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र, असे असताना सरकारने विलीनीकरण शक्य नसल्याचे यापूर्वीचं स्पष्ट केले आहे. त्यामुळं आता एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाची मागणी मान्य होत नसतील तर आम्हाला किमान स्वेच्छा मरणाची परवानगी देण्याची मागणी केली आहे. 

मंगळवारी औरंगाबाद येथील १७२ कर्मचाऱ्यांनी याबाबतचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे. आपल्या निवेदनात एसटी कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे की, एस.टी. महामंडळात आम्हाला मिळणारे तुटपुंजी वेतन तसेच इतर प्रकारे होणाऱ्या मानसिक त्रासामुळे आमच्यातील काही एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

तर आमच्याही मनामध्ये आत्महत्या करण्यासारखे विचार येतात परंतू , आत्महत्या करणे हा कायद्याने गुन्हा असल्याने आत्महत्या करू शकत नाही. त्यामुळे आम्हाला स्वेच्छा मरणाची परवानगी देण्यात यावी. ही स्वेच्छा मरणाची परवानगी आम्ही स्वतः करत असून, कुठल्याही दबावात न येता करीत आहोत,असं एसटी कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत निर्णय लागेल अशी अपेक्षा २० डिसेंबररोजी झालेल्या सुनावणीच्या वेळी कर्मचाऱ्यांना होती. मात्र, त्यानंतर २२ डिसेंबर तारीख मिळाली पण त्यावेळी सुद्धा तोडगा निघाला नाही, तसेच ५ जानेवारीची पुढील तारीख देण्यात आली. त्यामुळे मुंबई हायकोर्टात होणाऱ्या सुनावणीत न्यायालय काय निर्णय देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा