तरुणावर बलात्कार करणारा अटकेत

 Dalmia Estate
तरुणावर बलात्कार करणारा अटकेत
तरुणावर बलात्कार करणारा अटकेत
See all

मुलुंड - 27 वर्षीय तरुणीवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी अटक केलीय. अंबादास वाघमारे असं या नराधमाचं नाव आहे. पोलीस अधिकारी असल्याची बतावणी करून अंबादासनं तरुणीशी ओळख वाढवली. त्यानंतर या तरुणीला मुलुंडच्या मसाज पार्लरमध्ये नोकरी लावली. त्याच पार्लरमध्येच वाघमारे यानं या तरुणीवर बलात्कार केला. तसंच कुणाला न सागण्याची धमकीही दिली. त्यानंतरही अनेकदा त्यानं तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी अखेर मुलुंड पोलिसात तरुणीनं तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी अंबादासला अटक केली. अंबादास विरोधात खंडणीचे गुन्हे दाखल असल्याचंही समोर आलंय.

Loading Comments