अकरा वर्षीय मुलीवर अत्याचार करून हत्या

पोलिसांनी मुलीचा शोध सुरू केला. माञ त्यांना ही पावलो पावली अपयशाचाच सामना करावा लागत होता.

अकरा वर्षीय मुलीवर अत्याचार करून हत्या
SHARES
मुंबईत 11 वर्षीय मुलीचे अपहरण करत, तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या केल्याचा धक्कादायक घटना रविवारी दुपारी उघडकीस आली आहे. या घटनेनंतर परिसरात संतापाचे वातावरण असून मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार भांडुप पोलिस ठाण्यात दाखल आहे.


भांडुपच्या सोनापूर परिसरात राहणारी पीडित 10 वर्षीय अल्पवयीन मुलगी तिच्या अंगणात ऐकटीच खेळत होती. त्यावेळी अचानक मुलगी घरातल्यांना दिसेनाशी झाल्याने कुटुंबियांनी तिचा शोध घेण्यास सुरूवात केली. 12 तास उलटल्यानंतर ही तरुणी मिळून येत नसल्यामुळे मुलीच्या कुटुंबियांनी अखेर भांडुप पोलिस ठाण्यात तिच्या बेपत्ता होण्याची तक्राक नोंदवली. पोलिसांनी मुलीचा शोध सुरू केला. माञ त्यांना ही पावलो पावली अपयशाचाच सामना करावा लागत होता.

दरम्यान घाटकोपरच्या विद्याविहार रेल्वे स्थानकाहून काही अंतरावर एका अल्पवयीन मुलीचा कुजलेल्या अवस्थेत रेल्वे पोलिसांना मृतदेह आढळून आला. हा मृतदेह शवविच्छेदनासाठी पोलिसांनी राजावाडी रुग्णालयात पाठवला असता. मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचे तपासात पुढे आले. या प्रकरणी पुढे भांडुप पोलिस ठा‌ण्यात अनोळखी आरोपीविरोधात 302, 363,376,201 भा.द.वि. कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी तांञिक दृष्ट्या तपास करून एका संशयिताला या गुन्ह्यांत अटक केली आहे.
संबंधित विषय