मुंबई मध्ये एका पालकाने तिच्या मुलीला शाळा परिसरामध्ये एका अज्ञात व्यक्तीने इंजेक्शन दिल्याची तक्रार केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, ही घटना 31 जानेवारीची आहे. दरम्यान आता पालकांच्या तक्रारीवरून आता तक्रार नोंदवण्यात आली आहे.
पोलिसांनी आरोपीचा शोध घेण्यासाठी 5 टिम्स बनवल्या आहेत. शाळेच्या परिसरामधील सीसीटीव्ही पोलिसांनी तपासलं आहे यामधील फूटेज प्रमाणे कोणतीही संशयास्पद व्यक्ती आत किंवा बाहेर गेलेली नाही.
तक्रारीमध्ये पीडीत मुलीला इंजेक्शनच्य माध्यमातून काही अज्ञात पदार्थ दिल्याचं तक्रारीच म्हटले आहे. पण यामध्ये पीडीतेसोबत कोणत्याही अत्याचाराच्या गोष्टीचा उल्लेख नाही. दरम्यान मुलीची प्रकृती स्थिर असून इंजेक्शन नंतर तिला कोणताही त्रास झालेला नाही. पोलिस सध्या या घटनेत लक्ष देत आहे.
मुलीची प्रकृती स्थिर असल्याचे वृत्त आहे आणि तिला वैद्यकीय सेवा मिळत आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पाच पथके तयार केली आहेत.
हेही वाचा