ड्रग्ज विरोधी कारवाईत मुंबईसह महाराष्ट्र अग्रेसर

महाराष्ट्रापाठोपाठ पंजाब(११,५३६) व उत्तर प्रदेशात(१०,१९८) ड्रग्सप्रकरणी गुन्ह्यांची नोंद झाली आहे. अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्या अंतर्गत देशात ७२ ७७९ गुन्ह्यांची नोंद झाली होती. त्

ड्रग्ज विरोधी कारवाईत मुंबईसह महाराष्ट्र अग्रेसर
SHARES

सुशांत सिंग मृत्यूप्रकरणी मुंबईतील ड्रग्स तस्करांविरोधात केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथक(एसीबी) मोहिम उघडली असून त्या अंतर्गत आतापर्यंत २० जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, गेल्यावर्षीची आकडेवारी पाहिली, तर मुंबई पोलिसांसह राज्यभरात ड्रग्सविरोधात सर्वाधीक कारवाया करण्यात आल्या आहेत. परिणामी, मुंबईसह राज्यात अंमली पदार्थांप्रकरणी सर्वाधीक गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

हेही वाचाः- नवी मुंबईत मंगळवारी कोरोनाचे नवीन २६७ रुग्ण

राज्य गुन्हे नोंद विभागाच्या(एनसीआरबी) २०१९ च्या आकडेवारीनुसार मुंबईत ड्रग्स संबंधीत १२ हजार ४१८ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यात विशेष आणि स्थानिक कायद्या(एसएलएल) अंतर्गत दाखल गुन्ह्यांचाही समावेश आहे. याशिवाय राज्यात १४ हजार १५८ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती. त्यात १३ हजार १९९ गुन्हे सेवनासाठी ड्रग्स बाळगल्याप्रकरणी होते, तर ९५९ गुन्हे तस्करीसाठी ड्रग्स बाळगल्याप्रकरणी दाखल करण्यात आले होते. भादंवि कलमांसह एसएलएल गुनह्यांचाही त्यात समावेश आहे. महाराष्ट्रापाठोपाठ पंजाब(११,५३६) व उत्तर प्रदेशात(१०,१९८) ड्रग्सप्रकरणी  गुन्ह्यांची नोंद झाली आहे. अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्या अंतर्गत देशात ७२ ७७९ गुन्ह्यांची नोंद झाली होती. त्यात ४५ हजार ५०३ एसएलएलचा समावेश आहे. तर देशात तस्करीप्रकरणी २७ हजार २७६ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचाः- कल्याण डोंबिवलीत नवीन ३२८ कोरोना रुग्णांची नोंद

मद्य बाळगल्याप्रकरणी गुजरातमध्ये सर्वाधीक म्हणजे दोन लाख ४२ हजार ००४ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ तामिळनाडूमध्ये एक लाख ५५ हजार ६१० गुन्ह्यांची नोंद झाली आहे. एनसीबीसह संबंधीत यंत्रणांनी देशभरात ५७ हजार ८६७ गुन्ह्यांची नोंद केली आहे. त्यात ७४ हजार ६२० व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. त्यात परदेशी नागरीकांचाही समावेश आहे. २०१८ च्या तुलनेत गांजाबाबत दाखल गुन्ह्यांमध्ये २०१९ मध्ये १७ टक्के गुन्ह्यांची वाढ झाली आहे. देसभरातून तीन लाख ४२ हजार ०४५ किलो गांजा, चार हजार ४८८ किलो ओपियम, तीन हजार ५७२ किलो हशीश, तीन हजार २३१ किलो हशीश, ६८६ किलो एफिड्रीन जप्त करण्यात आले आहे

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा