Advertisement

नवी मुंबईत मंगळवारी कोरोनाचे नवीन २६७ रुग्ण

नवी मुंबईत मंगळवारी (६ ऑक्टोबर) कोरोनाचे नवीन २६७ रुग्ण सापडले आहेत. तर ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

नवी मुंबईत मंगळवारी कोरोनाचे नवीन २६७ रुग्ण
SHARES

नवी मुंबईत मंगळवारी (६ ऑक्टोबर) कोरोनाचे नवीन २६७ रुग्ण सापडले आहेत. तर ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता ३८,७३५ झाली आहे.

मंगळवारी बेलापूर ३०, नेरुळ ४८, वाशी ३३, तुर्भे ३९, कोपरखैरणे ४५, घणसोली ३८, ऐरोली ३२, दिघामध्ये २  नवे रुग्ण आढळले आहेत. दिवसभरात २९८ जणांनी कोरोनावर मात केली आहे.  बेलापूर ६२, नेरुळ ४७, वाशी ३६, तुर्भे ३८, कोपरखैरणे ४८,  घणसोली ३४, ऐरोलीमधील ३३ रुग्ण बरे झाले आहेत.  

बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३४,३३५ झाली आहे. तर मृतांचा आकडा ७८८ झाला आहे. नवी मुंबईत सध्या ३६१२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ८८ टक्के झाला आहे. 

शहरात खासगी रुग्णालयातील करोना रुग्णांच्या देयकांच्या तक्रारी मोठय़ा प्रमाणावर वाढल्या आहेत. यासाठी पालिकेने पालिका मुख्यालयातील तळमजल्यावर विशेष तक्रार निवारण कक्ष स्थापन केला आहे. संपर्कासाठी ०२२२/ ७५६७३८९  किंवा ७२०८४९००१० या व्हॉटसअँप क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.



हेही वाचा

रेमडेसिवीरचा काळाबाजार झाल्यास…

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत मुंबईतील तब्बल 'इतक्या' नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा